खामगाव दि ०४(उमाका) दिनांक १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागाती पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दिनांक ०१ /११/२०२२ या अर्हता दिनांकाच्या तीन वर्ष अगोदर (दिनांक ०१/११/२०१२ ) पदवी / पदविका पूर्ण केलेला स्थानिक रहिवाशी असलेला मतदार नागरीक पदवीधर मतदार यादीमध्ये नोंद नोंदणीकरीता पात्र आहे.सदर अर्हता पूर्ण करीत असलेले पदवीधर मतदार नोंदणी करीता १) नमुना १८ मधील अर्ज २) विद्यापिठ किंवा संबधीत संस्था यांनी दिलेली पदवी/ पदविका प्रमाणपत्र/ गुणपत्रीका ची प्रत राजपत्रीत अधिकाऱ्याने स्वाक्षांकित केलेली. ३) मतदार ओळखत्र / आधारकार्डची सत्यप्रत इत्यादीसह परिपूर्ण अर्ज दिनांक ०१/१०/२०२२ ते ०७/११/२०२२ पर्यंत तहसिल कार्यालय, निर्वाचन विभाग खामगांव येथे जमा करु शकतात.मा भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार पदवीधर मतदार संघाची यादी प्रत्येक निवडणूकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्यामुळे सध्या अस्तीत्वात असलेल्या मतदार यादीत ज्या व्यक्तींची नांवे समाविष्ट आहेत अशा सर्व व्यक्तींनी सुध्दा सुध्दा विहीत नमुन्यात नव्याने नमुना १८ मधील परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे. एकत्रीत स्वरुपातील अर्ज व्यक्तीशा सादर केलेले असो किंवा पोष्टाद्वारे सादर केलेले अर्ज मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी स्विकारल्या जाणार नाही. तथापी शासकीय कार्यालय प्रमुख, संस्था प्रमुख त्यांच्या अधिनस्त कार्यरत कर्मचाऱ्यांचे परिपूर्ण अर्ज एकत्रित पाठवू शकतात. याबाबत खामगांव तालुक्यातील पदवीधर मतदार नागरीकांनी नोंद घेऊन अमरावती पदवीधर मतदार संघाचे मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करावी असे अवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यावतीने करण्यात येत आहे.