लहान मुलांच्या वादातून डोंगरशेवलीत दोन गटांत राडा; गावात तणावपूर्ण शांतता

KHOZ MASTER
1 Min Read

Buldhana, दि. १ (प्रतिनिधी)
Dongarshevli येथे सोमनाथ महाराजांच्या यात्रेदरम्यान लहान मुलांमधील किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना ३१ मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी Amadapur Police Station यांनी दोन्ही गटांतील काही जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सध्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून वातावरण तणावपूर्ण असले तरी शांतता आहे.

चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे सोमनाथ महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे. ३० मार्च रोजी मंदिरात पूजाअर्चा पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी गावात यात्रा भरली होती. सायंकाळी चारच्या सुमारास लहान मुलांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला होता.

मात्र रात्री सुमारे नऊच्या सुमारास पुन्हा हा वाद उफाळून आला आणि दोन गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की व मारामारी झाली. या गोंधळात काही दुचाकींची तोडफोडही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

👮 पोलिसांच्या हस्तक्षेपाने टळला अनर्थ

घटनेची माहिती मिळताच Amadapur Police Station चे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याने दंगाकाबू पथकासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले.

पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. दुसऱ्या दिवशी परिस्थिती काही प्रमाणात निवळली असून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस सतर्क आहेत.

दरम्यान, या घटनेप्रकरणी दोन्ही गटांतील काही जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

0 9 5 5 4 5
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *