अपघातग्रस्ताचे प्राण वाचवून आरटीओ कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकी

KHOZ MASTER
1 Min Read

Khamgaon

Khamgaon–Shegaon Highway वर मानवतेचे दर्शन घडले. ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास Lasura Phata येथील Mauli Water Park समोर झालेल्या दुचाकी अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली.

या घटनेची माहिती मिळताच Khamgaon Sub Regional Transport Office येथील मोटार वाहन निरीक्षक Manoj Shelke आणि वाहन चालक Narayan Deshmukh यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला Sub District Hospital Khamgaon येथे दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे जखमीचे प्राण वाचल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेतून आरटीओ कर्मचाऱ्यांनी माणुसकी जपल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, Regional Transport Office Akola चे प्रादेशिक परिवहन अधिकारी Ravindra Bhuyar तसेच खामगावचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी Hemant Kharabe हे अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपघातग्रस्तांना वेळोवेळी मदत करण्याबाबत सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. या घटनेतून त्याचाच प्रत्यय आला.

हेल्मेट वापरण्याचे आवाहन

दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने सर्व दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असून वाहन चालवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.

0 9 5 5 3 2
Users Today : 34
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *