खडकपूर्णा नदीच्या बंधाऱ्यावरील प्लेटची तोडफोड; मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले एका आरोपीला अटक, तिघे फरार

KHOZ MASTER
2 Min Read

Sindkhed Raja :

तालुक्यातील देवखेड शिवारात Khadakpurna River वरील कोल्हापुरी बंधाऱ्यावर अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून लोखंडी प्लेट काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे बंधाऱ्यातील मोठ्या प्रमाणावरील पाणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Devkhed शिवारात २ एप्रिल २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ताडशिवनी येथील शेतकरी तात्यासाहेब देशमुख (वय ६५) हे पहाटे दोनच्या सुमारास आपल्या शेताला पाणी देण्यासाठी गेले असता बंधाऱ्यावर काहीजण लोखंडी प्लेट काढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

देशमुख यांनी गावातील इतर शेतकऱ्यांच्या मदतीने देवानंद डिघोळे (वय २५) याला पकडले. मात्र दत्ता दराडे, श्याम डिघोळे आणि किरण थोरवे हे तिघे घटनास्थळावरून फरार झाले. या गुन्ह्यात **Mahindra & Mahindra कंपनीचे एमएच-२८-बीवी-९०७९ क्रमांकाचे वाहन वापरल्याचेही समोर आले आहे.

या प्रकारामुळे बंधाऱ्यातील पाण्याचा साठा कमी होऊन शेतीसाठी आवश्यक पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी Kingao Raja पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३२६ (अ), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदारांच्या पुढाकाराने सिंचनासाठी पाणी सोडले होते

काही दिवसांपूर्वी आमदार Manoj Kayande यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खडकपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यास पुढाकार घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

रेती उत्खननासाठी कट; ऑडिओ क्लिप व्हायरल

दरम्यान, बंधाऱ्यावरील प्लेट काढण्यासंदर्भात काही व्यक्तींना “एक-एक प्लेट काढा” अशा सूचना दिल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेती तस्करांनीच हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर ११२ क्रमांकावर कॉल आल्यानंतर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पीएसआय मोहन गीते व पोलीस हवालदार अतिश सवडे यांनी देवानंद डिघोळे याला ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार संजय मातोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विश्वास काकड करीत आहेत.

0 9 5 5 7 9
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *