पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली असून सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४० वर्षीय शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
घटना कशी घडली?
मोशी येथील विनायकनगर, शिवशंभो कॉलनीमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामु कुंजल निसाद (वय ४०) याने २ एप्रिल रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावले. यावेळी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच, हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
धक्कादायक बाब म्हणजे, ३ एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावले आणि अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.
आई आणि आत्याने प्रत्यक्ष पाहिला प्रकार
या वेळी पीडित मुलीची आई आणि आत्या यांनी खिडकीतून हा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आपल्या मुलीवर होणारा हा अमानुष प्रकार पाहून त्या दोघी हादरल्या आणि त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
गुन्हा दाखल, आरोपीला अटक
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ६५ (२), ७४, ३५१ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत कलम ४, ६ आणि ८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात संताप
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.
प्रशासनाला आवाहन
बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत असून, अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. तसेच, पालकांनीही आपल्या मुलांच्या सुरक्षिततेकडे अधिक ल
