नागपूर
नागपूर महानगरपालिका व ओसीडब्ल्यूने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच येथील एक ते चार क्रमांकाच्या वॉटर ट्रिटमेंट प्लांट (डब्ल्यूटीपी) मध्ये ३६ तासांचे शटडाउन ठेवण्याचे नियोजन केले आहे. शटडाउनमध्ये फळमार्केट जवळील अमृत ९०० मिमी व्यासाच्या फीडर मेनलाइनवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम केले जाणार आहे.
शटडाउन *७ एप्रिल सकाळी ११ ते ८ एप्रिल रात्री १० वाजेपर्यंत* राहणार असून, शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा प्रभावित होईल.
प्रभावित झोन व भाग:
* *लक्ष्मीनगर झोन* – लक्ष्मीनगर जुने, गायत्रीनगर, ५०% जलकुंभ प्रभावित
* *धरमपेठ झोन* – रामनगर ईएसआर, रामनगर जीएसआर, फुटाळा लाइन, सिव्हिल लाइन्स, रायफल लाइन, सेमिनरी हिल्स, सेमिनरी हिल्स ईएसआर, दाभा, टेकडी वाडी, बर्डी
* *धंतोली झोन* – वंजारीनगर ओल्ड, वंजारीनगर न्यू, रेशीमबाग, धंतोली जलकुंभ
* *हनुमाननगर झोन* – चिंचभवन, ओमकारनगर विद्यमान व नवीन, हुडकेश्वर, श्रीनगर, नालंदानगर, नरसाळा टॅपिंग, अमृत डबलडेकर, हनुमाननगर जलकुंभ
* *नेहरूनगर झोन* – सक्करदरा १, २, ३, अमृत बिडीपेठ, अमृत बालाजीनगर जलकुंभ
* *गांधीबाग झोन* – सीताबर्डी किल्ला १ व २, किल्ला महाल, गोदरेज आनंदम, मेडिकल फीडर जलकुंभ
* *सतरंजीपुरा झोन* – बोरियापुरा, बोरियापुरा फीडर, सेंट्रल रेल्वे परिसर, वाहन ठिकाण जलकुंभ
* *आशीनगर झोन* – नारा, नारी, अमृत नारी १ व २, जरीपटका, नारा एनआयटी जलकुंभ
* *मंगळवारी झोन* – गिट्टीखदान, गोरेवाडा, अमृत गोरेवाडा, राजनगर
यादरम्यान लकडगंज झोनातील पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.
शहरात एकूण १०२ जलकुंभ आहेत आणि शटडाउनमध्ये जवळपास ५८ जलकुंभांवर पाणीपुरवठा थांबणार असल्याने शहरातील निम्म्या भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बाधित राहणार आहे.
मनपा व ओसीडब्ल्यू यांनी नागरिकांना *आवाजून सांगितले आहे की शटडाउन दरम्यान आवश्यक पाणीसाठा करून ठेवा आणि पाण्याचा वापर काटकसरीने करा
Users Today : 6