लोणार-किन्ही रस्त्यावर साईड भरावचे काम सुरू; अपघातांचा धोका कमी होणार*

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार

केंद्रीय मंत्री *प्रतापराव जाधव* यांच्या आदेशानुसार लोणार-किन्ही रस्त्यावर साईड भराव व रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

बऱ्याच वर्षांपासून *लोणार-किनगाव जट्ट रस्ता* लोणार सरोवराजवळील भागात खूप अरुंद होता, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या नाल्या पडलेल्या होत्या. या अरुंद रस्त्यामुळे अनेक अपघात झाले असून, नागरिकांचे जीवही धोक्यात आले होते.

ही स्थिती लक्षात घेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी *रस्ता साईड भराव व रुंदीकरणासाठी तत्काळ सूचना* दिल्या. कामाची सुरुवात *पलसिध्द कन्स्ट्रक्शन, साखरखेर्डेच्या **राजू काटे* यांच्या माध्यमातून ३ एप्रिल रोजी करण्यात आली.

साईड भराव व रस्ता रुंद केल्यामुळे आता *वाहनधारकांना होणारा त्रास कमी होईल*, अपघातांचा धोकाही घटेल. स्थानिक नागरिकांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे या उपाययोजनेसाठी आभार मानले आहेत.

ही कार्यवाही लोणार-किन्ही रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी मोठा दिलासा ठरेल.

0 9 5 7 3 5
Users Today : 6
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *