गोदरी
मौजे गोदरी येथे पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या *रेणुकामाता यात्रा महोत्सवाची* उत्साहपूर्ण आणि भक्तिमय *वहन मिरवणुकीत सांगता* करण्यात आली.
सदर यात्रा महोत्सवानिमित्त *२ एप्रिल २०२६* रोजी यात्रा, वगदी प्रदक्षिणा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी *अॅपे संघटनेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन* करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर *४ एप्रिल २०२६* रोजी सायंकाळी *६.३० वाजता* रेणुकामाता मंदिरापासून गावातील प्रमुख मार्गांवरून *मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. तसेच विविध क्षेत्रातील **नामांकित मान्यवर व नेतेमंडळी* उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि भक्तीमय वातावरणात ही मिरवणूक रंगली होती. रात्री *२ वाजेपर्यंत* चाललेल्या मिरवणुकीत ग्रामस्थ व भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
विशेष म्हणजे, या भव्य मिरवणुकीदरम्यान *पोलीस यंत्रणेने अत्यंत सतर्कता आणि दक्षता दाखवत चोख बंदोबस्त ठेवला*. पोलीस पाटील बीट अंमलदार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. गर्दीचे योग्य नियोजन करून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली.
तसेच *महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विजेची जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळल्यामुळे* कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्यास मोठी मदत झाली.
अखेर पारंपरिक पद्धतीने *वहन मिरवणुकीतून रेणुकामाता यात्रा महोत्सवाची यशस्वी सांगता* करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमामुळे गोदरी परिसरात *भक्ती, एकात्मता आणि सांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन* घडले.
Users Today : 6