नवरात्री निमित्ताने नऊ आजींचा सत्कार!

Khozmaster
3 Min Read

विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी. कुटासा शाळेचा अभिनव उपक्रम..!!जिल्हा परिषद मराठी शाळा कुटासा येथे नुकताच ‘माता पालक संघ’ अंतर्गत महिला मेळावा थाटात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटासा सर्कलच्या पंचायत समिती सदस्या सौ.सपनाताई ईश्वरदास झास्कर तर प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अनिताताई कलाने ,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,सौ सविताताई झास्कर, माजी सरपंच शित्रे ताई तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर अर्चना ढवळे मॅडम यांनी शारदास्तवन सादर केले. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व उपस्थितांचे गीताने इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनी स्वागत केले. प्रास्ताविकातून शाळेचे सन्माननीय उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री.विश्वास खापरे सर यांनी माता-पालक मेळाव्याचे महत्त्व विषद केले. तसेच सदर मेळाव्याच्या निमित्ताने घेत असलेल्या सगळ्या कार्यक्रमांचे नियोजन सर्व माता भगिनींना सांगितले.सदर महिला मेळाव्याचे निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शाळेच्या सदैव संपर्कात असलेल्या, शिक्षकांना वेळात वेळ काढून मदत करणाऱ्याना नेहमी संपर्क साधणाऱ्या प्रत्येक वर्गातील एक या प्रमाणे नऊ आजींचा सत्कार करण्यात आला सदर सत्कारांमध्ये इंदुबाई खोंड, लक्ष्मीबाई गावंडे मायाताई इंगळे सुमनबाई गवळी ,सुलोचनाबाई गावंडे ,अन्नपूर्णाबाई ढोके ,संगीता ताई सित्रे,मिराताई अतकरे, उमाताई ढोके, या आजींचा सत्कार करण्यात आला.तर अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सहकार्य करणाऱ्या सत्यभामा मेहरे, मालाताई गावंडे ,शीलाताई चौकणे वेणुताई मेहरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.निपुण भारत अंतर्गत मार्गदर्शनसदर मेळाव्याचा मुख्य उद्देश हा निपुण भारत अंतर्गत एक ते तीनच्या मातांचे जे गट तयार करण्यात आले त्या संदर्भात अपेक्षित असलेल्या क्षमतांपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी माता पालकांची आवश्यक असलेली मदत व सहकार्य व नियोजन यासंदर्भात सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी शाळेतील शिक्षक श्री अमर भागवत व श्री अनिल फलके यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले व त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.गरब्याचे सादरीकरण सदर कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता चौथी मधील विद्यार्थिनींनी त्यांच्या वर्गशिक्षिका अर्चना ढवळे मॅडम यांच्या मार्गदर्शनात सर्व उपस्थित महिला सदस्यां समक्ष गरबा नृत्याचे सादरीकरण केले.त्यानंतर खापरे सरांतर्फे सर्व उपस्थितांना फळांचे वाटप करण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ.अनीता निलेश कलाने, सुनीता श्रावण घाटोळे, शलाका शिवाजी चौकणे, शारदा राजू भोरे ,सौ शर्माताई ,सौ मोहिनी निलेश लाखे ,सर्व अंगणवाडी सेविका तसेच शाळेचे शिक्षक व मदतनीस यांचे विशेष सहकार्य लाभले.सुंदर असे फलकलेखन देवेंद्र फोकमारे यांनी केले तर समाधान निवाणे व नरेश धुमाळे यांनी उत्तम बैठक व्यवस्था केली. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन कु. वंदना पांडे मॅडम, प्रास्ताविक श्री विश्वास खापरे सर, आभार प्रदर्शन कु. अर्चना ढवळे मॅडम यांनी केले.

 

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *