मधील एकूण १० स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी (ता.१५) फक्त नऊ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. सत्तारूढ Bharatiya Janata Party व Shiv Sena युतीकडून सात, तर Nagpur Vikas Aghadi आणि Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या वतीने दोन अर्ज आयुक्त Dr. Vipin Itankar यांच्याकडे सादर करण्यात आले.
दरम्यान, All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (एआयएमआयएम) आणि National Union Muslim League या गटाला मिळालेल्या एका स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज सादर करताना मोठा वाद निर्माण झाला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केलेल्या नावाऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचा अर्ज भरला जात असल्याचा आरोप करत एआयएमआयएमचे पदाधिकारी आपसांतच भिडले. मनपा कार्यालयात झालेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे अखेर या गटाकडून अर्ज सादरच होऊ शकला नाही.
नागपूर मनपामध्ये एआयएमआयएमचे सहा आणि नॅशनल युनियन मुस्लीम लीगचे चार असे मिळून एकूण दहा नगरसेवक आहेत. या गटाला एक स्वीकृत सदस्यपद देण्यात आले आहे. स्वीकृत सदस्यपदासाठी एआयएमआयएमचे मध्य नागपूर अध्यक्ष फहीम अकरम अंसारी यांचे नाव पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार Imtiaz Jaleel यांनी जाहीर केले होते. त्याबाबत त्यांनी सामाजिक माध्यमांवरही माहिती दिली होती.
अर्ज सादर करण्याची अंतिम वेळ बुधवार, १५ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ आधी गटाचे नेते शकील पटेल आणि नॅशनल मुस्लीम लीगचे प्रदेशाध्यक्ष व नगरसेवक असलम खान मुल्ला हे नरेंद्र जिचकार यांना सोबत घेऊन आयुक्त कार्यालयाकडे जाताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.
यावरून पक्षाबाहेरील व्यक्तीला स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जात असल्याचा आरोप करत एआयएमआयएम आणि नॅशनल मुस्लीम लीगचे पदाधिकारी आयुक्त कक्षासमोरच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले. शाब्दिक वाद तीव्र झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला.
या गोंधळात आयुक्तांनी संबंधितांना आधी आपापसातील वाद मिटवून कोणाचा अर्ज सादर करायचा ते निश्चित करण्याचा सल्ला दिला. मात्र या सर्व घडामोडीत अर्ज सादर करण्याची मुदत संपल्याने या गटाकडून कोणाचाही अर्ज दाखल होऊ शकला नाही.
दरम्यान, निगम आयुक्त रंजना लाडे यांनी सांगितले की, सध्या दहापैकी नऊ अर्ज प्राप्त झाले आहेत. उर्वरित एका सदस्याबाबत पुढील सर्वसाधारण सभेत होणाऱ्या कार्यवाहीनंतर स्वतंत्र अधिसूचना काढण्यात येईल.
Users Today : 9