सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर 📊 नागपुरात पूर्वेश कापसे ९९.४% गुणांसह अव्वल; यामिनी आडे दुसऱ्या क्रमांकावर

KHOZ MASTER
2 Min Read

(सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी चार वाजता जाहीर करण्यात आला. या परीक्षेत शहरातील Podar International School मधील विद्यार्थी *पूर्वेश कापसे* याने ९९.४ टक्के गुण मिळवत शहरात प्रथम क्रमांक पटकाविला.

तर Montfort School मधील यामिनी आडे हिने ९९.२ टक्के गुणांसह शहरातून दुसरा क्रमांक मिळवला. प्रथम उत्तरवार हिने तृतीय टॉपरचे स्थान प्राप्त केले आहे.

सीबीएसईकडून १५ ते २० एप्रिलदरम्यान निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार बुधवारी दुपारी अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक शाळांमधील शिक्षकांना सुटीनंतर पुन्हा शाळेत धाव घ्यावी लागली.

निकालात Bharatiya Vidya Bhavan च्या श्रीकृष्णनगर शाखेतील रिषित अग्रवाल आणि आष्टी शाखेतील समृद्धी मंथापूरवार यांनी संयुक्तपणे ९८.८ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. तर सिव्हिल लाइन्स शाखेतील *सिद्धेश बंड* याने ९८.२ टक्क्यांसह तिसरा क्रमांक मिळवला. तसेच Centre Point School मधील यशवी डागा हिने ९८ टक्के गुणांसह चौथा क्रमांक पटकाविला.

गणित व भौतिकशास्त्राच्या पेपरवर तक्रारी
यंदा जिल्ह्यातील सुमारे १५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीची परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान काही गोंधळही पाहायला मिळाले. गणिताचा पेपर अत्यंत कठीण आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या. तसेच प्रश्नपत्रिकेवरील क्युआर कोड स्कॅन केल्यावर गाण्याचा व्हिडिओ दिसल्याची घटना देशभर चर्चेचा विषय ठरली.

याशिवाय भौतिकशास्त्राचा पेपरही सुमारे ८० टक्के न्यूमेरिकल स्वरूपाचा व काहीसा कठीण असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्व अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे.

१५ मेपासून दुसऱ्या परीक्षेची संधी

सीबीएसईने निकाल जाहीर केला असला तरी ज्या विद्यार्थ्यांना या निकालाबाबत समाधान नाही किंवा जे अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेची संधी देण्यात आली आहे. १५ मेपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत.

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार सीबीएसईने *दोन बोर्ड परीक्षा पद्धत* लागू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

शाळांमध्ये आनंदोत्सव

निकाल जाहीर होताच शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांची गर्दी झाली. मित्रांसोबत एकमेकांचे अभिनंदन करत, हस्तांदोलन करून आणि जल्लोष करत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा आनंद साजरा केला.

0 9 6 3 4 9
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *