प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नवापूर तालुक्यातील दुधवे येथील पत्नीला पती व सवतीने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नवापूर तालुक्यातील दुधवे येथील सुदाम जेरमा नाईक यांनी त्यांची पहिली पत्नी मिनाक्षी सुदाम नाईक यांना विचारले की माझी दुसरी पत्नी अमृता कुठे गेली आहे . यावर मिनाक्षी नाईक यांनी तुमची पत्नी तुमच्या सोबत गरबा खेळण्यास गेली होती , मला काय माहिती असे सांगितले . याचा राग आल्याने सुदाम नाईक याने मिनाक्षी नाईक यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली . तसेच अमृता नाईक हिनेही काठीने मारहाण करीत पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर जिवेठार मारण्याची धमकी दिली . याबाबत मिनाक्षी नाईक यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात सुदाम नाईक व अमृता नाईक यांच्याविरोधात भादंवि कलम ३२४ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तेरसिंग वसावे करीत आहेत .
Users Today : 54