प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:शहादा शहरातील सप्तश्रृंगी माता मंदिर परिसरातून व नवापूर तहसील कार्यालयाच्या आवारातून अशा दोन ठिकाणाहून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली . या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा येथील दशरथ सेना निकुंभ यांच्या मालकीची दुचाकी ( क्र.एम.एच .३ ९ एस ७६४० ) शहादा शहरातील सप्तश्रृंगी माता मंदिर परिसरातून चोरट्याने चोरुन नेली . तसेच नवोपूर येथील प्रितन प्रभाकर वसावे यांच्या मालकीची दुचाकी ( क्र.एम.एच .३ ९ ८ ९ ५० ) नवापूर तहसील आवारातून चोरट्याने चोरुन नेली . याबाबत शहादा व नवापूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
Users Today : 54