मोटारसायकलची समोरासमोर धडक ; एक जखमी.

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:शहरातील जाणता राजा चौक जवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली .   या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नंदुरबार शहरातील पटेलवाडी येथील निखील अनिल पाडवी हा दुचाकीने ( क्र . एम . एच . ३ ९ एस ३६३ ९ ) जाणता राजा चौकाकडून जगतापवाडीकडे जात होते .   यावेळी एका दुसऱ्या दुचाकी चालकाने त्याच्या ताब्यातील दुचाकी ( क्र.एम.एच .३ ९ ८७ ९ १ ) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात समोरुन येणाऱ्या निखील पाडवी यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला .    यात निखील पाडवी यांना गंभीर दुखापत झाली . याबाबत निखील पाडवी यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात भादंवि कलम २७ ९ , ३३७ , ३३८ , मोटार वाहन अधिनियम १८४ प्रमारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोना.सामनसिंग वसावे करीत आहेत .

0 9 4 6 2 2
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *