प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार-: तालुक्यातील धानोरा येथील गुजरात राज्याला जोडणारा पूल मागील गेल्या दोन दिवसापूर्वी अचानक पणे कोसळला अशा स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या पुलाच्या नुकसानी बाबत संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा.
नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी क्षतीग्रस्त कोसळलेल्या पुलाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्त पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे . नंदुरबार तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्ग 6 वरील धानोरा गावा जवळील पुल कोसळल्याची घटना घडली होती , यात सुदैवाने कुठलीही मनुष्यहानी झाली नसली तरी जिल्ह्यातील धोकेदायक पुलांचा प्रश्न पुन्हा समोर आले आहेत , जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचे समोर आले होते , या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सर्वच पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांनी धानोरा पुलाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली , यानंतर त्यांनी माध्यमांच्या सोबत संवाद साधत जिल्ह्यातील सर्वच पुलाचे ऑडिट महिनाभरात न झाल्यास जिल्ह्यातील धोकेदायक पुलांवर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे .
Users Today : 36