शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव येथे तासिका तत्वावर शिल्पनिदेशकाची पदे भरती

Khozmaster
1 Min Read

खामगाव दि६-(उमाका)शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगांव जि. बुलडाणा येथे खालील नमुद केलेल्या रिक्त जागेवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर शिल्प निदेशकाची पदे(५) शि. नि. मशिनिष्ट – २ यंत्रअभियांत्रिकी पदवी किंवा पदविका किंवा ITI/CTI (machinist )(२) शि.नि. कातारी ०१ यंत्र अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका किंवा ITI / CTI (Turner) ३) शि.नि. संधाता -०१ यंत्रअभियांत्रिकी पदवी किंवा पदविका किंवा ITI/CTI (Welder)(४) शि.नि. तारतंत्री ०१ विदयुत अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका किंवा ITI CTI (Wireman)(५) शि.नि. यांत्रिक मोटारगाडी ०१ ऑगेमोबाईल अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका किंवा यंत्रअभियांत्रिकी पदवी किंवा पदविका किया ITI CTI (Mech. Motor vehical)ई. पदे भरावयाची आहेत संबंधितांना शासन निर्णयानुसार तासिका घेतल्याचे मानधन अनुज्ञेय राहील. तरी ईच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक १२/१०/२०२२ रोज बुधवारला दुपारी १२.०० वाजता आपल्या सर्व मुळ व छायाकिंत प्रमाणपत्रे व सह मुलाखतीस स्वखर्चाने संस्थेत उपस्थित राहावे. अर्जाची संख्या जास्त असल्यास चाळणी / कौशल्या परिक्षा घेण्यांत येईल. असे प्रभारी प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांनी आवाहन केले आहे.

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *