आई जगदंबा अंबाबाई तुळजा भवानी मातेचा ऐतिहासिक नगरप्रदक्षिणा पालखी सोहळा जल्लोषात संपन्न.

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर : श्री आई अंबाबाई तुळजा भवानी मातेचा पालखी नगरप्रदक्षिणा सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी आई अंबाबाई तुळजा भवानी भक्तांकडून फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्यांनी पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. या पालखी सोहळ्यात हजारो भक्त आवर्जून सहभागी झाले होते. अंबाबाई तुळजा भवानी मातेचा जागर करत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री अंबाबाईचा पालखीतुन नगरप्रदक्षिणा सोहळा भर पावसातही सळसळत्या उत्साहात पार पडला. संध्याकाळी सहा च्या सुमारास अंबाबाईच्या पालखीचे पूजन होऊन नगरप्रदक्षिणेला प्रारंभ करण्यात आला.

यानंतर अंबाबाई बाळापूर वेस महाद्वार, पाटील मंडळी.गुजरी लाईन,मार्गे (खडकेश्वर वेटाळ जगदंबा देवी ), तेलीपुरा चौक,कासार वेटाळ मार्गे (भगत वेटाळ अंबादेवी ), गुरुवार पेठ (तुळजा भवानी देवी ) या आपल्या पारंपरिक मार्गांवरून मंदिरात परत येऊन ऐतिहासिक पालखी सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी असंख्य महिला भाविक भक्तांतर्फे देवीची ओटी भरण्यात आली. या पालखी मार्गांवरून जातांना अनेक सामाजिक संघटनाच्या वतीने रात्रभर चहा,नाश्ता,थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती .

आईची नगरप्रदक्षिणा म्हणजे देवी सिमोलांघनणासाठी व शहरवासीयांच्या भेटीसाठी मंदिरातून बाहेर पडते असे मानले जाते. मुख्य प्रवेशद्वारातून निघालेली नगरप्रदक्षिणा खडकेश्वर देवी मंदिर पासून आई रेणुका माता टेकडी जवळून बाळापूर वेस महाद्वार रोड मार्गे गुजरी लाईनमधून देवीची ही प्रदक्षिणा पूर्ण करत पुन्हा मंदिरात पोहोचत असते.यावेळी हजारो हजारो भक्त या नगरप्रदक्षिनेत सहभागी होत असतात.

मात्र मागीलवर्षी कोरोना संसर्गामुळे नागरिकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली होती. यामुळे नगरप्रदक्षिनेच्या मार्गात अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग टाकून नागरिकांसाठी रस्ते बंद करण्यात आले होते मात्र यंदा निर्बंध मुक्त दसरा सण साजरा होत असल्याने हजारो भाविक आई अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणेसाठी पातूर शहरात पालखीत सहभागी झाले होते.फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवलेल्या अंबाबाईच्या पालखीचे पूजन अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.नवरात्रौत्सवा नंतर पारंपरिक पालखी सोहळा व दसऱ्यानिमित्त्य श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळा यांच्या वतीने 25 फूट उंचीच्या भव्य रावण पुतळ्याचे दहन करून विजयोत्सव साजरा करण्यात आला . या कार्यक्रमात पंचक्रोशोतील बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.

 

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *