पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन यांचा दि. ४ ऑक्टोबर २०२२ पासून सी. ए. टी. सी. कॅम्प १४४ ला सुरुवात झाली असुन, ११ महाराष्ट्र बटालियनचे एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या नेतृत्वामध्ये या कॅम्पचे आयोजन होत आहे. या कॅम्प मध्ये एकूण ३१६ एन.सी.सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला असून आठ दिवस चालणाऱ्या या कॅम्प दरम्यान त्यांना नेतृत्व, एबट्रेकल, फायरिंग तसेच त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी प्रभावशाली मार्गदर्शन करण्यात येत आहे. आज अकोला महानगर पालिका तर्फे फायर फाइटिंग चे धडे देण्यात आले. चीफ फायर ऑफिसर मनियार साहेब, असिस्टेंट फायर ऑफिसर मनीष कथले, मार्गदर्शक अभिजीत मनोहर, फायरमैन राहुल वाकोड़े, फायरमैन निखिल आपोतीकर, फायरमैन हनुमान घाटोले व वाहनचालक शैलेश नीकोले यानी यांनी फायर झाल्यानंतर घ्यावयाची काळजी तसेच फायरचे वेगवेगळे प्रकार याविषयी कैडेट्सला मार्गदर्शन केले. या कॅम्पसाठी एल.आर.टी. कॉलेजचे ऑफिसर लेफ्टनंट डॉ. अनिल तिरकर, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डॉ. उज्वला शिरसाट होली क्रॉस स्कूलचे चीफ ऑफिसर पराग राऊत व भारत विद्यालयाचे चीफ आफिसर संजय घोगरे यांच्या देखरेख खाली या कँपचे आयोजन करण्यात आले. सुभेदार मेजर अशोककुमार यांच्या अंतर्गत या कॅम्पचे नियोजन होत आहे.