नवरात्र व दसरा सोहळया निमित्त करण्यात आला तगडा बंदोबस्त

Khozmaster
2 Min Read

मुर्तिजापुर (भुषण महाजन) :- नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याकरीता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच सर्वच पोलीस ठाणे स्तरावर दंगा नियंत्रण सराव, पथसंचलन, शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. यानिमित्त तगडा पोलीस बंदोबस्त संपूर्ण शहरामध्ये होता. छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेषातील पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.

समाजोपयोगी उपक्रम राबवादुर्गादेवी व शारदादेवी मंडळ स्थापना करताना पोलीस विभागाकडून ऑनलाईन परवानगी घ्यावी. तसेच इतर विभागांकडूनही आवश्यक परवानगी घ्यावी. नवरात्रोत्सव काळात प्रतिबंधित डी.जे. चा वापर न करता समाजोपयोगी व आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे. पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या सुचनांचे व नियमांचे पालन करावे, असे केलेल्या मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या आवाहनाला सर्व मंडळानी व आयोजकांनी प्रतिसाद देत नवरात्र महोत्सव आनंदात पार पडला. दसरा सोहळयाला सुध्दा तगडा बंदोबस्त पहावयास मिळाला. पार्किंगची व्यवस्था अशा प्रकारे करण्यात आली होती की, रावण दहन सोहळा झाल्यानंतर सुध्दा कोणत्याच प्रकारची गर्दी तर झाली नाही आणि वाहतुकीला सुध्दा अडथळा निर्माण झाला नाही. याबाबत प्रशासनाकडून सविस्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

नगर पालिके मध्ये मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांनी यावर्षी स्वच्छ मिशनचे खरे अवलोकन करुन दिले. रावण दहना अगोदर व रावण दहनाच्या दुसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या साफसफाई मुळे कोठेही कचरा किंवा घाण आढळून आली नाही.

 

0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *