चिखली
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व नगर विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने चिखली तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी व एकाच दिवशी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी लाभदायी ठरल्याचे दिसून आले.
या शिबिराचे उद्घाटन श्री. अंकुशराव पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख हे होते. यावेळी तहसीलदार विजय सवडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर, उपनगराध्यक्ष वैशालीताई कपिल खेडेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुषमाताई चव्हाण, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर, नगरसेवक गोपाल देव्हडे, दीपक खरात, डॉ. महमद इसरार, ज्योतीताई वाळेकर, बाळू जाधव, राम बनसोडे, सुरेंद्र ठाकूर, कैलास खराडे, नायब तहसीलदार मुरली गायकवाड, अर्जुन इंगळे, मंडळ अधिकारी पवार, तलाठी अनिरुद्ध खेडेकर, पुरवठा अधिकारी श्रीमती सोनकाबळे, सिद्धेश्वर ठेंग, संतोष देशमुख, प्रशांत भटकर, शेख आसिफ भाई यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात महसूल विभागाच्या विविध सेवा, दाखले, प्रमाणपत्रे, घरकुल योजना, महिला बचत गट लाभ, पीएम किसान नोंदणी, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग व माजी सैनिकांसाठीच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवून प्रशासन जनतेच्या दारी पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, चिखली मतदारसंघात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Users Today : 32