समाधान शिबिरात १४६ प्रकरणांचा निपटारा; १९७ घरकुल लाभार्थ्यांना रेती पावत्यांचे वितरण ## बीबी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार 
लोणार तालुक्यातील बीबी येथे आनंद मंगल कार्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला. शिबिरात महसूल विभागाशी संबंधित १४६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर घरकुल योजनांतील १९७ लाभार्थ्यांना तब्बल ९८३ ब्रास रेती पावत्यांचे वितरण करण्यात आले. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, तहसीलदार भूषण पाटील, नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर, रामप्रसाद डोळे, मयूर ईप्पर, बबन कांबळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी आरती दांडगे, मंडळ अधिकारी शिवशंकर खरातवाल, सुहास जोशी आणि लक्ष्मण सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच ग्राम महसूल अधिकारी यशवंत घरजाळे, सचिन खिल्लारे, निलेश जाधव, शोभा मस्के, नारायण दहातोंडे, सुधीर हनवते आणि किशोर भोळाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू इंगळे, सरपंच गणेश काकड तसेच सामाजिक कार्यकर्त्या सविता भांड यांनीही शिबिराला भेट देत नागरिकांशी संवाद साधला.

शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध महसुली, पुरवठा व घरकुलसंदर्भातील समस्या ऐकून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *