देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

KHOZ MASTER
3 Min Read

बुलढाणा

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (All India Organisation of Chemists and Druggists) यांच्या वतीने बुधवार, दि. 20 मे 2026 रोजी देशव्यापी एक दिवसीय औषध विक्री बंदची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडित व सुरळीत उपलब्ध राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, बुलढाणा कार्यालयाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

दि. 13 मे 2026 रोजी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात सहाय्यक आयुक्त (औषधे) गजानन प्रल्हाद घीरके यांच्या अध्यक्षतेखाली केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत बंदच्या काळात नागरिकांना आवश्यक औषधे उपलब्ध राहावीत यासाठी समन्वय, खबरदारी आणि पर्यायी व्यवस्था यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सह आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच 24 तास सुरू असणाऱ्या मेडिकल स्टोअर्सशी समन्वय साधण्यात आला आहे. अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच आयएमए व निमा संघटनांकडेही सहकार्याची विनंती करण्यात आली आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी खालील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

अन्न व औषध प्रशासन, बुलढाणा कार्यालय हेल्पलाईन क्रमांक : गजानन प्रल्हाद धीरके, सहाय्यक आयुक्त (औषधे) – 9850150687, जयंत झोपे, प्रमुख लिपिक – 9765333474, मु. ज. खुर्दे, रोखपाल – 9922899958, विजय जाधव, डाटा एंट्री ऑपरेटर – 8262878895, अजाबराव घेवंदे – 9623556863.

तालुकानिहाय आपत्कालीन औषध उपलब्धता हेल्पलाईन क्रमांक :

बुलढाणा : गजानन शिंदे – 9860729624, प्रशांत ढोरे पाटील – 9730042135, निलेश गावंडे – 9422884890, अभिजीत निंबाळकर – 7972698570
चिखली : राजेश पाटील – 7038926622, स्वप्नील तायडे – 7507759777, सर्जेराव भुते – 9422883160, डोणगाव – प्रशांत चोपडे – 9588696970
मेहकर : रवींद्र वडते – 9011250800, विनोद नागवानी – 9049002419, विष्णू लाहोटी – 8793143337, उमेश मुंदडा – 8830079412
देऊळगाव राजा: राम पराड – 9764455220, चंद्रशेखर बारोटे – 8275284850, नंदकिशोर साळोख – 9960010699
सिंदखेडराजा : मंगेश खुरपे – 9011581018, शरद डोईफोडे – 9423458220, भारत जायभाये – 9860731777
लोणार : शेख अफसर – 9730772555, चंदन दरोगा – 9637296703, अक्षय मीनासे – 9881955105
मोताळा : नितीन शेळके पाटील – 9854967777, केतन मोदे – 9923881122
मलकापूर : गोपाल मालपाणी – 9422882870, गजानन धनोकार – 9423721716, श्रीकांत आढाव – 9096759099
नांदुरा : प्रेमचंद जैन – 9423146101, उमेश काळु – 9881496116, नीरज चवरे – 9096744405
जळगाव जामोद : राजेश काळे – 9850937212, अजय पलन – 8087059355, प्रमोद टाकळकर – 9767869172
संग्रामपूर : पांडुरंग इंगळे – 9420794848, शेख अफरोज – 9226055416, गिरीश केला – 9623238959
शेगाव : अजिंक्य ठाकरे – 8275341532, उमेश इंगळे – 8856845129, गजानन भिवटे – 9822427521, गोपाल गांधी – 9850670057
खामगाव : रामचंद्र आयलानी – 9922112500, जगदीश नावंदर – 9922185678, नंदकिशोर कांडेकर – 9850040568, अजय जैन – 7588802147, धर्मेश शहा – 9922112877

0 9 7 3 6 2
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *