जळगाव जामोद:
धर्माचे अधिष्ठान आणि संस्कृती जपल्याशिवाय भावी पिढ्यांचा उद्धार शक्य नाही. त्यामुळे वारकरी धर्म परिषदेच्या वतीने प्रत्येक गावात संस्काराचे बीजारोपण करण्यासाठी सामूहिक हरिपाठ,संस्कार शिबिर गाव तेथे घेणार असल्याचा निर्धार वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष हभप विलास महाराज वाघमारे यांनी व्यक्त केला.
गाव तेथे सामूहिक हरिपाठ पठण संकल्प अभियानाला 17 में पासुन वारकरी धर्म परिषदेच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील परमहंस रामचंद्र महाराज यांची समाधीभूमी खांडवीतून प्रारंभ करण्यात आला. यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रबोधनकार अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे, हभप नागोराव सारोकार,जिल्हा सचिव नंदकिशोर निमकर्डे, सचिव शेख युनुस, जिल्हा सल्लागार मधुकरराव ढोले सर , हभप प्रदीप भागवत सर,नांदुरा तालुकाध्यक्ष स्वरूप महाराज घाडगे, सल्लागार नंदा सोनुने, तालुका अध्यक्ष हभप अश्विन कवरे,राजश्री नेमाडे, हभप सचिन अतकारे, माजी सैनिक वसंतराव मिरगे, विनोद सायकारे, मंगेश बावस्कर, शालिकराम खवले दिनेश शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
परमहंस सदगूरू रामचंद्र महाराज आणि श्रीराम महाराज मेहुणकर, सोपान महाराज यांचे दर्शन आशिष घेऊन गाव तेथे सामूहिक हरिपाठ पठण अभियानाला संवाद परिषदेच्या माध्यमातून सकाळी प्रारंभ करण्यात आला. खांडवी, येरळी, उटी, निंभोरा तर जळगाव जामोद येथील श्रीराम मंदिर, अयोध्या नगर, रामनगर तर तालुक्यातील विविध गावांमध्ये वारकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. सदर अभियाना दरम्यान असंख्य धर्मनिष्ठ वारकऱ्यांनी वारकरी धर्म परिषदेच्या विचार प्रवाहात जाहीर प्रवेश घेतला. तर जळगाव जामोद खांडवी येथील संवाद परिषदेदरम्यान तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
&_
कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक पाटील यांचा सत्कार.
जळगाव जामोद कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी असंख्य गाईंची कत्तल होण्यापासून वेळोवेळी वाचविले. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेत वारकरी धम्म परिषदेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान तालुक्यातील वारकरी बालसंस्कार शिबिरांना भेटी देण्यात आल्या.ज्या ठिकाणी वारकरी बालसंस्कार शिबिरांना सुविधांचा अभाव आहे. त्यांचे नियोजन करण्यात आले.
सदर अभियानादरम्यान वारकरी धर्म परिषद, वारकरी, ग्राम स्वराज्य समिती, आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने सहभाग घेत यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
&_
जळगाव जामोद
दिनांक 18/05/2026
Users Today : 21