अंत्रीकोळी (चिखली)
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंत्रीकोळी येथे रायपूर पोलिसांनी दहशतवादविरोधी पथक (ATS) अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मोठी कारवाई करत अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ७ लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई १८/०५/२०२६ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पंचासमक्ष आर्म अॅक्टनुसार करण्यात आली.
जप्त केलेला मुद्देमाल
कारवाईदरम्यान पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
- दोन देशी बनावटीची पिस्तुले
- चार मॅगझिन
- ९२ जिवंत काडतुसे
- २ वापरलेली काडतुसे
- एक लोखंडी चाकू
- महिंद्रा XUV500 (MH 20 DJ 8687)
- आयफोन 16 प्रो मॅक्स मोबाईल
एकूण अंदाजे ७,०५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींची माहिती
या प्रकरणात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे:
- शुभम सागर पवार (रा. कारला चौक, वर्धा, जि. वर्धा)
- रुपेश मिलन शिंदे (रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना)
- रोहेल मिलन शिंदे (रा. पाचोरा, जि. जळगाव)
गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम 3, 5, 7, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135(3) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रायपूर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोहेका अनंत कळमकर, पोहेका दशरथ शितोळे, पोहेका ज्योती गलबले, पोका राहुल जाधव, पोका लक्ष्मण शिंदे, पोका अख्तर शेख, पोका लक्ष्मण शिंदे, चालक पोहवा सागर कोरडे तसेच दहशतवादविरोधी पथक अकोला यांचा समावेश होता.
पुढील तपास सुरू
या गुन्ह्याचा पुढील तपास रायपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार निलेश सोलंके आणि पोका लक्ष्मण शिंदे करीत आहेत. आरोपींच्या नेटवर्कचा आणि शस्त्रसाठ्याच्या स्त्रोताचा शोध घेण्यात येत आहे.
