निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा अपुरा पुरवठा होत असून नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम दैनंदिन जीवनावर होत असून वाहनधारक, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या अडचणीत आले आहेत.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पंपसेट आणि शेतीमाल वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज आहे. मात्र इंधन उपलब्ध नसल्यामुळे शेतीकामे खोळंबली असून उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर ही आणखी मोठी अडचण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या प्रकरणी शासनाने तातडीने उपाययोजना करून पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले.
यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
