लोणार शहर व तालुक्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून पेट्रोलपंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

KHOZ MASTER
1 Min Read

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलच्या उपलब्धतेबाबत अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील सर्व प्रमुख पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मेहकर रोड, बुलढाणा रोड आणि मंठा रोडवरील पेट्रोलपंपांवर दुचाकी, चारचाकी तसेच ट्रॅक्टरसाठी डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. अनेक नागरिकांनी हातात कॅन व ड्रम घेऊन इंधन साठवण्यासाठी धाव घेतल्याचे चित्र होते. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गात विशेष चिंता निर्माण झाली असून पुढील काळासाठी डिझेल साठा करण्याकडे कल वाढला आहे.

दरम्यान, तहसीलदार भूषण पाटील आणि पुरवठा विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून इंधनाचा काळाबाजार किंवा जादा दराने विक्री होणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

तसेच गर्दी नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्याची गरज निर्माण झाल्याचेही स्पष्ट होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *