‘लायन ऑफ मल्टिपल’ या सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्काराने तेजस झांबड यांचा गौरव

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव 

लॉयन्स क्लब खामगावचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे तेजस प्रकाशचंद झांबड यांना नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या लॉयन्सच्या बहुप्रांतीय संमेलन ‘विजयोत्सव’मध्ये ‘लायन ऑफ मल्टिपल’ हा सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

खामगाव क्लबच्या ५० वर्षांच्या गौरवशाली इतिहासात प्रथमच हा मान पटकावणारे ते पहिले मानकरी ठरले आहेत. गेल्या दशकभराहून अधिक काळ लॉयन्स चळवळीत निःस्वार्थ सेवा, प्रभावी नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत बहुप्रांतीय स्तरावर हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

या सन्मानाबद्दल विविध सामाजिक, व्यावसायिक आणि लॉयन्स क्लब पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *