उष्णतेने होरपळणाऱ्या पक्ष्यांच्या मदतीला चिमुकले धावले नांदुरातील समर कॅम्पमध्ये ‘पक्ष्यांसाठी घरटी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

KHOZ MASTER
2 Min Read

Nandura

येथील Nilesh Deshmukh व Mangesh Deshmukh ही बंधू दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर कॅम्पचे आयोजन करतात. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, पर्यावरणाविषयी जिव्हाळा आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने यावर्षी त्यांनी ‘पक्ष्यांसाठी घरटी’ हा विशेष उपक्रम राबविला.

सध्या वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांचे हाल होत असून पाण्याअभावी अनेक पक्षी त्रस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंमधून पक्ष्यांसाठी घरटी तयार करून त्यांना अन्न व पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.

या उपक्रमात Nilesh Deshmukh यांनी विद्यार्थ्यांना टाकाऊ साहित्यापासून घरटी तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी खोकी, प्लास्टिक बाटल्या, रिकामी भांडी, नारळाच्या करवंट्या, गवत, कागद आणि इतर टाकाऊ साहित्याचा वापर करून आकर्षक घरटी तयार केली. ही घरटी अंगणात, गॅलरीत, घरांच्या छतावर, बागेत तसेच झाडांवर लावण्यात आली.

यासोबतच पक्ष्यांसाठी धान्याचे दाणे आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. उन्हाळाभर हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी व्यक्त केला.

Mangesh Deshmukh यांनी सांगितले की, “पक्ष्यांचे संवर्धन आणि निसर्गाचे रक्षण ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.”

या उपक्रमात जय बोदडे, सोहम दामोदर, आश्विन पातुरकर, वेदांत कुटे, राम कोळस्कार, अर्णव हेलोडे, आर्यन हेलोडे, अवनी हेलोडे, श्लोक काजळे, रुही केने, गिरीजा कुलकर्णी, समर्थ वेरूळकर, मयंक डंबेलकर, सर्वेश कुटे, ईश कुटे, श्लोक नारखेडे, यश राऊत, वीरेन नारखेडे, श्वास सुरळकर, भूमी नारखेडे, शिवानी मनस्कार, श्रेया मोरे, अर्णव देशमुख, अद्विक देशमुख, अधिराज देशमुख यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *