संग्रामपूर :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संग्रामपूर येथील संपर्क कार्यालयात रविवारी करण्यात आले. या शिबिरात जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुका पूर्ण तयारीनिशी लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रशिक्षण शिबिरास केंद्रीय मंत्री Prataprao Jadhav यांच्यासह बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार, शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक संजय अगलदरे, पश्चिम विदर्भ सचिव वैभव थोरात, शिवसेना सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे, जिल्हाप्रमुख संतोष डीवरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शारदा खानझोडे पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, युवासेना लोकसभा अध्यक्ष चेतन घिवे, खामगाव विधानसभा बीएलए प्रमुख अॅड. अमोल अंधारे, उपजिल्हाप्रमुख राहुल मारोडे व देविदास घोपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी SIR अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या शिवसेना BLA नेमणूक अभियानाचा आढावा घेण्यात आला. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवर BLA नेमणुका लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीत बूथस्तरावरील संघटन बळकटीकरण, स्थानिक पातळीवरील रणनीती, मतदार नोंदणी प्रक्रियेतील अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकांसाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी घेतलेल्या विविध कल्याणकारी निर्णयांचा उल्लेख करत शिवसेना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
