साठेबाजांना प्रशासनाने अद्दल घडवावी – आ. श्वेता महाले ## इंधन टंचाईवर चिखलीत संयुक्त बैठक; अफवांवर कठोर कारवाईचे निर्देश

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली 

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार Shweta Mahale Patil यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, पुरवठा विभाग, पोलीस यंत्रणा आणि पेट्रोलपंप चालक यांची संयुक्त बैठक घेतली.

बैठकीत आमदार महाले यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, इंधन टंचाई ही केवळ स्थानिक समस्या नसून जागतिक परिस्थितीचा परिणाम आहे. मात्र काही लोक राजकीय फायद्यासाठी अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

## अफवांवर कठोर कारवाईचे निर्देश

अशा अफवा पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, तसेच साठेबाजांवर प्रशासनाने कडक पावले उचलून त्यांना “अदद घडवावी”, असे निर्देश त्यांनी दिले.

त्यांच्या मते, या अफवांमुळे शासकीय वाहने, नगर परिषदेच्या घंटागाड्या आणि रुग्णवाहिकांनाही पेट्रोल पंपांवर रांगेत उभे राहावे लागत आहे, ही गंभीर बाब आहे.

## शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी

पेट्रोल पंप चालकांनी साठेबाजांना इंधन न देता शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच पुरवठा विभाग व प्रशासनाने पंप चालकांना योग्य सुरक्षा व सहकार्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी दिली.

पेट्रोल पंप चालकांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भविष्यात शेतकरी व नागरिकांना योग्य सेवा देण्याचे आश्वासन दिले.

## उपस्थित मान्यवर

या बैठकीस नगराध्यक्ष, विविध अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *