लोणार : धारातीर्थ येथील आंघोळीवरील बंदी हटवण्याची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार 

ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या विरज धारातीर्थ येथे आंघोळीवर लावण्यात आलेली बंदी हटवावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. भाविकांसाठी हे तीर्थस्थान खुले करण्यात यावे, अशी भूमिका विविध लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.

ही मागणी नगरसेविका सौ. सुप्रिया मापारी, नगरसेवक श्यामभाऊ राऊत, युवासेना तालुका प्रमुख गजानन विश्वंभर मापारी तसेच शहरातील हिंदू बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संबंधित प्रशासन विभाग आणि पुरातत्त्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की धारातीर्थाचे धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन भाविकांना आंघोळीची परवानगी पुन्हा देण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर गजानन विश्वंभर मापारी, नगरसेवक श्याम पुंजाजी रज्जत, दिनेश राधेश्याम पुरोहित, दर्शन शर्मा, योगेश इरतकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा आणि तहसीलदार लोणार यांना देण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *