जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

KHOZ MASTER
1 Min Read

जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अतिरिक्त स्वरूपात इंधन खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज विविध ऑईल कंपन्यांकडून जिल्ह्यात एकूण ५ लाख ९५ हजार लिटर इंधन साठा प्राप्त झाला आहे. पुढील काळातही नियमितपणे इंधन पुरवठा सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नागरिकांना आवश्यक तेवढेच पेट्रोल व डिझेल खरेदी करण्याचे आवाहन केले असून, पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळण्यास सांगितले आहे. जिल्हा प्रशासन हे सर्व ऑईल कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात असून इंधन वितरण सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कुठेही इंधन टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत अतिरिक्त इंधन साठा करणे, साठेबाजी करणे किंवा नफेखोरी करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनी शांतता आणि संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *