अभिजित पाटील हे सध्या देशातील सर्वात चर्चेत असलेल्या युवा IPS अधिकाऱ्यांपैकी एक ठरले आहेत.

KHOZ MASTER
1 Min Read

IPS Abhijeet Patil :

अभिजित पाटील हे सध्या देशातील सर्वात चर्चेत असलेल्या युवा IPS अधिकाऱ्यांपैकी एक ठरले आहेत. अवघ्या २२ व्या वर्षी UPSC परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करत त्यांनी अखिल भारतीय स्तरावर ४७० वी रँक मिळवली आणि राजस्थान कॅडरमध्ये IPS अधिकारी म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे कोणतेही कोचिंग न लावता त्यांनी हे यश संपादन केले.

ठाणे येथे जन्मलेल्या अभिजीत पाटील यांचे वडील तुलसीराम पाटील हे मुंबई महापालिकेत चीफ ऑडीटर होते, तर आई सिंचन विभागात कार्यरत होत्या. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य नियोजनाच्या जोरावर त्यांनी UPSC सारखी कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली.

IPS वर्दीतील त्यांचा तरुण चेहरा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांना ते नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडलेले विद्यार्थी वाटतात. राजस्थान कॅडरच्या 2023 बॅचमध्ये त्यांची निवड झाली असून, ते राज्यातील सर्वात तरुण IPS अधिकाऱ्यांपैकी एक मानले जात आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *