पिंपळगाव देवी येथे वारकरी धर्म परिषदेची संवाद परिषद संपन्न
मोताळा:
संस्कृती आणि वारकरी परंपरेचे अधिष्ठान टिकले तरच धर्म टिकेल.वारकरी संप्रदायिक संस्कृतीचे बिजारोपण संस्कारातूनच होत असते. तेच संस्कार पेरण्याचं काम वारकरी धर्म परिषदेच्या माध्यमातून होत आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा स्वयंभू कालनेमींचा धुडगूस चिंतेची बाब आहे. त्यामुळेच वारकरी धर्म परिषदेच्या माध्यमातून संस्कार आणि संस्कृतीचे जतन करण्याचा आम्ही प्रयास करतोय असे मत वारकरी धर्म भूषण वासुदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले.
26 में ला सायंकाळी मोताळा तालुक्यातील ग्राम पिंपळगाव देवी येथील प्रभु रामचंद्र मंदिर सभा मंडपामध्ये वारकरी धर्म परिषदेची संवाद परिषदेचे आयोजन ग्राम शाखेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वासुदेव महाराज शास्त्री यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपरोक्त मत व्यक्त केले.
ग्राम समितीची स्थापना.
वारकरी धर्म परिषदेची कार्यपद्धती आणि भविष्यातील गाव तेथे सामूहिक हरिपाठ, ज्ञानेश्वरी पठण, संस्कार शिबिरांचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने पिंपळगाव देवी ग्राम शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्यामध्ये शिवाजी जानराव वाघ अध्यक्ष ,सुरेश शेषराव पाटील उपाध्यक्ष, पंजाबराव पाटील, सचिव, मल्हार माणिकराव पाटील, सहसचिव,
प्रदीप सोपान पाटील, कार्याध्यक्ष,सोपान जिजाबराव पाटील, सरचिटणीस,रवींद्र शिवाजी शिंगोटे, प्रसिद्धीप्रमुख, ईश्वर परशराम पाटील महासचिव, सुधाकर प्रल्हाद हिवाळे कार्याध्यक्ष, डिगांबर त्र्यंबक पाटील, उपाध्यक्ष,बाळकृष्ण माणिकराव पाटील संघटक पदी सर्वानूमते निवड करण्यात आली.
यावेळी विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुप्रसिद्ध कथाकार विलास महाराज वाघमारे, राष्ट्रीय महासचिव हभप अँड.सतीशचंद्र रोठे पाटील,जिल्हाध्यक्ष प्रकाश महाराज घोंगटे, जिल्हा सचिव शेख यूनूस, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग महाराज गव्हाळकर, तालुकाध्यक्ष रमेश शेळके पाटील,
जिल्हा सल्लागार हभप मधुकर महाराज इंगळे, नंदाताई सोनोने, हभप ज्ञानदेव महाराज भांबेरे पाटील, नांदुरा तालुका अध्यक्ष मंदाताई सोनटक्के तालुकाध्यक्ष नांदुरा हभप सुबोध गावडे महाराज घाडगे,
शेगाव तालुकाध्यक्ष हभप डोंगरकार य मलकापूर, खामगाव, मोताळा तालुक्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ वारकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
