*पळसखेड सपकाळ येथे वाढदिवसानिमित्त सेवाकार्य; सेवासंकल्प आश्रमात निराधार बांधवांसोबत स्नेहभोजन*

KHOZ MASTER
2 Min Read

पळसखेड सपकाळ, ता. मेहकर प्रतिनिधी

वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा उत्सव न राहता समाजातील वंचित, निराधार आणि आधाराची गरज असलेल्या बांधवांसोबत आनंद वाटण्याचा दिवस असावा, या भावनेतून पळसखेड सपकाळ येथे आगळ्या-वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. पळसखेड सपकाळ येथील सेवासंकल्प आश्रमात जाऊन निराधार तसेच मानसिक आजाराने त्रस्त बांधवांसोबत वेळ घालवत त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

सेवासंकल्प आश्रमाचे संस्थापक नंदकुमार पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या आश्रमात वास्तव्यास असलेल्या निराधार बांधवांना शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने आमरसाचे मिष्ठान्न भोजन देण्यात आले. या वेळी उपस्थित बांधवांच्या चेहऱ्यावर दिसलेला समाधान आणि आनंद हेच खऱ्या अर्थाने वाढदिवसाचे सर्वोत्तम गिफ्ट असल्याची भावना संबंधितांनी व्यक्त केली.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांना आधार देणे हीच खरी मानवसेवा असून राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजपरिवर्तनासाठी असावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वंचित, बेघर आणि मानसिक आजाराने त्रस्त बांधवांना मायेचा आधार देणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सेवासंकल्प आश्रमात अनेक वर्षांपासून नंदकुमार पालवे यांनी सुरू केलेले कार्य हे अत्यंत प्रेरणादायी असून अशा सेवाभावी उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणे हे भाग्याचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास मृत्युंजय गायकवाड, पृथ्वीराज गायकवाड, गजेंद्र दांदडे, बाळासाहेब धुड, आशिष जाधव, प्रवीण जाधव, श्रीकांत गायकवाड, नितीन राजपूत, विजय जायभाये, विजय कोल्हे, नयनप्रकाश शर्मा, अजय हडाले, बबलू मावतवाल, सतीश बरडे, युनूस मेंबर, उदयदादा देशपांडे, मोहन पऱ्हाड, योगेश परसे, संजय निकम, अशोक वावरे, अजय खोत, अनिल पवार, अजय बिल्लारी, पुरुषोत्तम हेलगे, शेख जावेद, शेख बाबा, गोविंदा खुमकर, बंडू आसाबे, विष्णुमामा मुळे, सोळंकी मेजर, अमित ठाकरे, प्रशांत जाधव, देवेन खोत, पवन भालेराव, विजय दुरणे, श्रीकांत शिरसाट, संजय पंडितकर, अरुण ढोरे, जगदीश मानवतकर, विकास राजपूत, सागर घट्टे, कुणाल अग्रवाल यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आश्रमातील बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या तसेच पुढील काळातही अशा सेवाभावी उपक्रमांना सातत्याने पाठबळ देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *