समतेच्या विचारांचा जागर करीत चिखलीत ‘समता रथ’चे उत्साहात स्वागत

KHOZ MASTER
4 Min Read

चिखली 

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘समता रथा’चे चिखली शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि परिवर्तनाचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर प्रवास करणाऱ्या या रथामुळे शहरात सामाजिक जागर निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा ‘समता रथ’ राज्यभर फिरत असून, महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत आहे. चिखलीत रथाचे आगमन होताच घोषणाबाजी, फुलांची उधळण आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या रथामध्ये सन १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू झालेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचा ऐतिहासिक देखावा साकारण्यात आला होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली. समाजप्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या रथातील कलावंतांचेही कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, समता परिषद शहराध्यक्ष कैलास सपकाळ, श्रीराम झोरे, दीपक खरात, शहराध्यक्ष सागर पुरोहित, सुजित भराड, विलास कंटुले, सुदर्शन खरात, विलास चव्हाण, सुभाष खरात, हरिभाऊ राऊत, प्रकाश सपकाळ, अंबादास खरात, भरत खरात, रामेश्वर राऊत, रामेश्वर मेहेत्रे, नारायण राऊत, ज्ञानेश्वर मेहेत्रे, राजेश मेहेत्रे, अभय तायडे, सुचित भराड, विजय खरात, विष्णू बळी, भगवान जाधव, विष्णू बांडे, प्रल्हाद बांडे, लक्ष्मण बांडे यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर समाजात सातत्याने होत राहणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

समतेच्या विचारांचा जागर करीत चिखलीत ‘समता रथ’चे उत्साहात स्वागत

*चिखली :* क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २००व्या जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘समता रथा’चे चिखली शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि परिवर्तनाचा संदेश घेऊन महाराष्ट्रभर प्रवास करणाऱ्या या रथामुळे शहरात सामाजिक जागर निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला हा ‘समता रथ’ राज्यभर फिरत असून, महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत आहे. चिखलीत रथाचे आगमन होताच घोषणाबाजी, फुलांची उधळण आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या रथामध्ये सन १८४८ मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू झालेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेचा ऐतिहासिक देखावा साकारण्यात आला होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली. समाजप्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या रथातील कलावंतांचेही कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, समता परिषद शहराध्यक्ष कैलास सपकाळ, श्रीराम झोरे, दीपक खरात, शहराध्यक्ष सागर पुरोहित, सुजित भराड, विलास कंटुले, सुदर्शन खरात, विलास चव्हाण, सुभाष खरात, हरिभाऊ राऊत, प्रकाश सपकाळ, अंबादास खरात, भरत खरात, रामेश्वर राऊत, रामेश्वर मेहेत्रे, नारायण राऊत, ज्ञानेश्वर मेहेत्रे, राजेश मेहेत्रे, अभय तायडे, सुचित भराड, विजय खरात, विष्णू बळी, भगवान जाधव, विष्णू बांडे, प्रल्हाद बांडे, लक्ष्मण बांडे यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर समाजात सातत्याने होत राहणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *