परमपूज्य श्री सद्गुरू परमानंद नारायण सरस्वती मठ, रानअंत्री येथे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या अंतर्गत सुमारे २ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच ५० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या डोम सभामंडपाचे लोकार्पण करण्यात आले.
तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करून भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे, धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि श्रद्धास्थानाचा कायापालट घडवून आणणे हा या विकासकामांमागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शासनाच्या माध्यमातून या पवित्र स्थळासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, आगामी काळातही भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती मान्यवरांनी दिली.
या सोहळ्यास संस्थानचे अध्यक्ष श्री. वसंतराव झाल्टे, श्री. अंकुशराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, गोपीनाथजी लहाने, दासा पाटील, भगवानराव बंगाळे, विष्णू झगरे सर, शिवसेना नेते प्रदीपभाऊ वाघ, सरपंच प्रदीप थिगळे, सरपंच अरुण सरनाईक, गजानन झाल्टे, एकनाथराव झाल्टे, नंदकिशोर धोडगे, गजानन धोडगे सर, निखिल पडघान, किशोर कणखर सर, संतोष झाल्टे, विश्वासराव झाल्टे, विलास इंगळे, विनायकराव झाल्टे, कैलासराव झाल्टे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात धार्मिक वातावरणात पूजन, भूमिपूजन आणि लोकार्पण विधी पार पडले. उपस्थितांनी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले.
