चिखली
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त चिखली शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रभक्ती, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश देणाऱ्या सावरकरांच्या विचारांना उजाळा देत विविध मान्यवरांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नगराध्यक्ष मा. श्री. पंडितदादा देशमुख, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, विविध लोकप्रतिनिधी, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी, सावरकर समितीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या राष्ट्रनिष्ठ, त्यागमय आणि प्रेरणादायी जीवनातून नव्या पिढीने प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमात घोषणाबाजी, पुष्पहार अर्पण आणि सावरकरांच्या विचारांवरील मनोगतांमुळे परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.
