रिपब्लिकन सेनेच्या वतीने दिनांक 6/10/2022 रोजी तहसीलदार व ठाणेदार चिखली यांना निवेदन देण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर विषयी काढलेले उदगार हे फक्त भाजप मंडळींना खुश करण्यासाठी असावे यावरून सर्व बौद्ध बांधवांच्या भावना दुखावून एक प्रकारची चिड निर्माण झाली आहे ज्या रामदास आठवले यांना मंत्री बनवले ते स्वतःच्या कर्तुत्वावर नसून ते फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले आहे हे विसरता कामा नये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 साली येवले मुक्कामी धर्मांतराची घोषणा केली होती त्यावर 21 वर्षे त्यांनी सर्व धर्मांचा सखोल अभ्यास करून 14 ऑक्टोबर 1956 झाली नागपूर ठिकाणी बौद्ध धर्म स्वीकारला हे सर्व जगाला माहिती आहे जर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला नसता आणि आठवले साहेबा सारखे जनसंघात जाऊन हुजरेगीरी केली असती तर रामदास आठवले यांच्या चड्डीला दोन दोन थिगळं असते व ते आज मंत्री नसून नाली साफ करताना दिसले असते रामदास आठवले यांचा अभ्यास व ज्ञान फारच तोटके आहे ते फक्त वेड्यावाकड्या कविता बोलून पंतप्रधान व इतर लोकांना हसवतात तर यावरून त्यांना असे वाटते की मी फारच मोठा कवी आहे परंतु हा त्यांचा भ्रम आहे आठवले साहेबांनी समाजाच्या हितासाठी कोणतेही कार्य केले नाही त्यामुळे सर्व समाज हा आठवले वर नाराज आहे आणि त्यातच हे असले बालिश वक्तव्य करून बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तरी अशा हुजरेगिरी करून बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून आठवले यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवावा आणि त्यांनी काढलेल्या उदगारामुळे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या म्हणून सर्व बौद्ध बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा रिपब्लिकन सेने तर्फे जिल्ह्यात तीव्र आंदोलन खेडण्यात येईल व भविष्यात आठवले यांना बुलढाणा जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा घणघणीत इशारा जिल्हा अध्यक्ष भाई विजयकांत गवई जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे जिल्हा महासचिव सलीमभाई यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी सुरेशभाऊ इंगळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शेख मुख्तार,रमेश अंभोरे शहर उपाध्यक्ष, सतीश पवार शहर उपाध्यक्ष, अन्सार भाई ता. उपाध्यक्ष, सतीश इंगळे ता.संघटक, शेख वशिम ता. उपाध्यक्ष, प्रदिप हिवाळे, विश्वनाथ सपकाळ, शेख दानिश, दीपक तायडे, शेख जावेद, राहुल साळवे, विजय वाधवाणी, यश बावस्कर, देवा शिसागर, विकी निकाळजे, स्वराज शिसागर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 61