खुनाच्या आरोपातून आरोपींची केली निर्दोष सुटका – ऍड अंजली देशमुख

Khozmaster
2 Min Read

सतीश मवाळ मेहकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने कलम

३०२ व ५०४ मा• कं. वि. च्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिनांक २६ / ९ / २०२२ रोजी दिला.

सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की

अंजनी खुर्द येथील रहिवासी दिपक आत्माराम अवसरमोल

हयानी मेहकर पो.स्टे. मध्ये विनोद आत्माराम अवसरमोल हयान

दिनांक १७ / ८/ २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास त्याची आई नामे कमलबाई आत्माराम अवसरमोल हीच्या डोक्यात कु-हाडीचा

वार करन जख्मी केले व तिला उपचारा करीता मेहकर येथे दवाखाण्यात

नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. यावरून पो.स्टे.

मेहकर हयानी फिर्यादी दिपक आत्माराम अवसरमोल याच्या फीर्यादी वरून आरोपी विनोद आत्माराम अवसरमोल याचे विरुद्ध कलम ३०२ व

५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर घटनेचा तपास मेहकर पोलीस

स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार आत्माराम प्रधान हयानी केला. व

आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

न्यायमूर्ती एस. एम. चंदगडे

हयानी पो.स्टे. मेहकर हयानी दाखल केलेल्या अपराधा

क्रमांक २९३/ ०१९

मधिल आरोपी विनोद आत्माराम अवसरमोल हयाची पुराव्या अंती

आरोपीची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेले

साक्षीदार यांचा उलट तपास मेहकर येथील विधीज्ञ अॅड. अंजली विनोद

देशमुख हयानी केला व त्यानी केलेला प्रभावी युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.त्यांचे मेहकर न्यायालयातील सहकारी यांनी अभिनंदन केले व त्याना ऍड विनोद एम. देशमुख यांचे सहकार्य लाभले.

 

0 9 4 6 4 7
Users Today : 61
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *