उबारखेड येथे लम्पी आजाराने गोरा दगावला

Khozmaster
1 Min Read

विनोद वसु अकोट ता प्रतिनिधी  

तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेले उबारखेड येथे 4 ऑक्टोंबर रोजी लम्पी आजाराने गोरा दगावल्याची घटना घडली.

मागील महिन्यात गट ग्रामपंचायत खेलदेशपांडे/ उबारखेड च्या वतीने लम्पी लसीकरण कॅम्प घेण्यात आला. लसीकरण कॅम्पमध्ये गावामधील 550 जनावरांना लम्पी लसीकरण लस देण्यात आली.तरी सुद्धा बरेच जनावरे लंपी आजाराने ग्रस्त आहेत.गोपीचंद राघोजी गोळे यांचा 4 ऑक्टोंबर रोजी लम्पी आजाराने गोरा दगावला असून गोऱ्याचा रंग लालसर, पांढऱ्या पट्टेचा होता.यावेळी ग्रामपंचायत सरपंच पती शेख यासीन,उपसरपंच अनिल भाकरे, दिनेश गवारगुरु पंचगव्हाण पशुवैद्यकीय डॉक्टर शहा यांच्या सक्षम पाहणी करण्यात आली. पंचगव्हाण गावामध्ये जनावरांना बऱ्याच प्रमाणात लम्पी साथ चालू आहे.तरी संबंधित विभागाने पंचगव्हाण गावामध्ये लम्पी लसीकरण कॅम्प घेण्यात यावा.व शासनाने लम्पी मुळे जे जनावर दगावले असतील त्यांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी.अशी मागणी पशुपालक करीत आहे.

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *