प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे ग्रामीण आरोग्य केंद्रात सार्वजनिक आरोग्य विभाग , राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत व ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अभियान अंतर्गत आरोग्य शिबिर संपन्न झाले . यात ग्रामीण भागातील रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख खा . डॉ . हिना गावित यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .
अध्यक्ष स्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य शकुंतला शिंत्रे नंदुरबार शिवसेना जिल्हा समन्वयक दीपक गवते , शेतकी संघ संचालक सुरेश शिंदे , नंदुरबार चे नगरसेवक गौरव चौधरी , सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ओगले , पिंटू भाबड , डॉ . राजेश वसावे , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ . सुलोचना बागुल उपस्थित होते . या आरोग्य शिबिरात सर्व तज्ञ डॉक्टर मार्फत रुग्णांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या यात ईसीजी , एक्स – रे , सिटीस्कॅन , रक्त तपासणी , डोळे तपासणी , मलेरिया तपासणी मोफत करण्यात आले तसेच सर्व प्रकारचे औषधे रुग्णांना मोफत देण्यात आले . सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा नंदुरबार यांच्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित या या कार्यक्रमांतर्गत जवळजवळ 350 पेक्षा जास्त रनाळे सह परिसरातील नागरिकांनी आरोग्याची तपासणी करून घेतली .
या वेळी ग्रामीण आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय पवार , डॉ शत्रुघ्न गडदे , डॉ आकाश राजपूत , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमितकुमार पाटील , तालुका आरोग्य अधिकारी डॉ जाफर तडवी , डॉ मनोज गावित , डॉ उमेश गिरासे ,आरोग्य सेवक हितेंद्र बडगुजर , सुनील पदमोर , प्रकाश धनगर , गणेश देवरे , सहाय्यक अधीक्षक राजेंद्र गिरासे , वृषाल बाविस्कर , हितेंद्र चौधरी , प्रमोद वैराज , राहुल कसबे , वरसाळे , श्रीमती दुसाने , मनोज पवार , भाऊसाहेब गोसावी , वनिता व्यवहारे , धनश्री पाटील , राकेश वानखेडे , रामू धनगर , जगदीश वानखेडे , आबिद बागवान आदींचे आरोग्य शिबीर संपन्न करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले .
Users Today : 38