प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:तालुक्यातील पाताळगंगा भोणे ते दुधाळे रस्त्यावरील नदीच्या पात्रात पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन म्हशींना विद्युत धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला .
नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील मनोहर प्रताप पाटील त्याच्या शेतात पाणी देण्यासाठंधी पाताळगंगा नदीच्या पात्रात अनधिकृत पणे इलेक्ट्रिक मोटार टाकली होती . यावेळी धनराज दला धनगर यांच्या मालकीच्या दोन म्हशी पाणी पिण्यासाठी गेल्या असता नदीच्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे दोन्ही म्हशींचा मृत्यू झाल्याने २ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले .
या बाबत वीज वितरण कंपनीचे राजीव गणेश रंजन यांच्या फिर्यादी वरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात मनोहर पाटील याच्याविरोधात भारतीय विद्युत २००३ चे कलम १३८ व भादंवि कलम ४२ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोहेकॉ . सामुद्रे करीत आहेत
Users Today : 36