प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार –:शहरातील नुतन हायस्कुल जवळील इलेक्ट्रिक दुकान फोडून चोरट्याने दीड लाख रुपये किंमतीची रोकड लंपास केल्याची घटना घडली . नंदुरबार येथील महेशकुमार लेखराज नानकाणी यांचे शहरातील नुतन हायस्कुल समोरील जयहिंद इलेक्ट्रिकल दुकान आहे . सदर दुकान फोडून चोरट्याने प्रवेश करुन दीड लाख रुपयांची रोकड चोरुन नेली .
याबाबत महेशकुमार नानकाणी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४ , ५४७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करीत आहेत .
Users Today : 46