प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार –:नंदुरबारचे पालकमंत्री ना . डॉ . विजयकुमार गावित यांच्या नागरी सत्काराचे आयोजन येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात दि . 9 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले आहे . महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल ना.डॉ. विजयकुमार गावित यांचा नागरी सत्कार शहादा तळोदा मतदारसंघाचे आ . राजेश पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजितकरण्यात आला आहे . रविवार दि . 9 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमास खा . डॉ . हिनाताई गावित , भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , माजी आमदार शिरीष चौधरी , पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव कमलताई पाटील , पंचायत समिती शहादाच्या सभापती बायजाबाई भील ,जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई दीपक पाटील , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील सखाराम पाटील , खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम तुकाराम पाटील , शहादा तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र रावल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे . या जाहीर नागरी सत्कार समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले आहे .
Users Today : 51