प्रतिनिधी विशाल गवई अकोट आकोट रुईखेड तालुक्यातील व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रुईखेड येथुन जवळच असलेल्या मार्डी येथील भवानी माता मंदीरात दरवर्षी प्रमाने याही वर्षी नवरात्र महोत्सव निमित्ताने या वर्षी सुद्धा किर्तन भजन पुजन महाप्रसाद तसेच अशा प्रकारे अनेक विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहे.भाविकांचे श्रद्धास्थान व ग्रामस्थांचे ग्राम दैवत असुन भवानी माता मंदिरात भाविकांची गर्दी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात दिसून आली तसेच यावेळी हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेल्या भवानी माता मंदीराची महाराष्ट्रत मोठ्या प्रमाणात ओळख असुन महाराष्ट्रातील काण्या कोपऱ्यात हे मंदिर प्रसिद्ध आहे. कार्यक्रम यशस्वी करीता सेवाधारी रुईखेड, बोचरा, पणज ,अकोट महागाव, तुरखेड ,कारला ,मार्डी या परिसरातील सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले श्री देवी भवानी संस्थान कडुन विश्वस्त बाळासाहेब लोढम यांनी सर्वांचे आभार मानले.
Users Today : 39