ता. प्रतिनिधी पातूर:राज्य शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाने नुकतेच एक पत्र काढून ० ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करून त्या विद्यार्थीचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यामुळे राज्यभरातील हजारो शाळा कायमच्या बंद होणार आहेत.मराठी शाळांचे अस्तित्व यामुळे धोक्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थीची गैरसोय होऊन अनेक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ येणार आहे शिक्षण हक्क कायद्यामध्ये पटसंख्येवरून शाळा बंद करण्याचा असा कुठलाही नियम किंवा अट नाही. त्यामुळेच आज शेवटच्या घटकापर्यंत ग्रामीण भागातील खेड्यातील तांडा वाड्या’ वस्त्यांवर शाळा सुरू आहेत.त्या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले हे गोरगरिबांची अत्यंत दुर्बल घटकातील मुले शिक्षण घेत आहेत ह्या शाळा बंद करून मुलांचे शिक्षण बंद करण्याचे राज्य शासनाचे चुकीचे धोरण आहे. त्यांना गोरगरीबांच्या मुलांचे शिक्षण कायमचे बंद करायचे असल्याची चर्चा होत आहे शासनाचे हे धोरण खेड्या वस्त्या व तांड्यातील गोरगरिबांनसाठी अत्यंत घातक आहे लवकरच शासनाने ही कार्यवाही थांबवावी अशी मागणी सर्वसामान्या मध्ये होत आहे. असे झाल्यास या निर्णया विरोधात अनेक न्यायालयीन प्रकरणे उद्भवू शकतात महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत घातकी निर्णय आहे. यामध्ये ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करु नये अशी मागणी शिक्षक आघाडीचे अनिल आयस्कार यांनी केली आहे.
Users Today : 39