10 ऑक्टोंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार – : राज्य शासकीय निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्तीवेतन धारकांसाठी सोमवार 10 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथे पेंन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व राज्य निवृत्ती वेतनधारकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दे.ना.पाटील यांनी केले आहे.या पेन्शन अदालतीत प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हकदारी ) मुंबईचे अधिकारी उपस्थित राहणार असून या अदालतीमध्ये निवृत्तीवेतन धारकांच्या संबंधित समस्या आणि मागण्याचे निराकरण करण्यात येणार आहे. प्रधान महालेखाकार, मुंबई कार्यालयाच्या वतीने पेन्शनरांच्या सोईकरीता अनेक उपक्रम राबविले जात आहे यात, साप्ताहिक ऑनलाईन पेन्शन संवाद,24 तास उपलब्ध करुन दिला आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-22-0014 तर व्हॉईस मेल क्रमांक 020-71177775, ईमेल helpdesk.mh1ae@cag.gov.in असा आहे. यात माहिती वाहिनी, पेन्शन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र उपक्रमांची माहिती देण्यात येते. तरी सर्व निवृत्तीवेतन व कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार

0 9 4 6 4 0
Users Today : 54
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *