चिखली : सामाजिक, साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी उलेखनीय कार्य करणा-या बहुजन साहित्य संघाच्या वतीने साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, मानवीय तथा मनोरुग्ण सेवा आणि पत्रकारीतेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व त्यास्तव समर्पित जीवन जगणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे अत्यंत प्रतिष्ठेचे फुले – शाहू – आंबेडकर – राज्य पातळीवरील २०२१ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुप्रसिद्ध कथाकार बबन महामुने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुरस्कार निवड समिती अध्यक्ष, विधीज्ञ रेखा हनुमंते,शाहीर मनोहर पवार, विधीज्ञ कवी सर्जेराव साळवे, कवी किसन पिसे, कवी महेश वाधवाणी, ज्ञानेश्वर पंचांगे, डॉ.आर.पी.गवई, डॉ.शिवकुमार मोळवणे, डॉ.तृप्ती काटेकर, प्रा.शालीनी काटोले, सुधाकरराव जाधव या समितीने पुरस्कारार्थींची निवड केली. प्रा. डॉ.ऋषीकेश कांबळे ( साहित्य क्षेत्र- भाई तुम्ही कुठे आहात ? ) औरंगाबाद, डॉ.सतीष तराळ, ( वैचारीक लेखन ) अमरावती, डॉ. संघर्ष सावळे, ( अध्ययन ) मलकापूर, डॉ. शिवचरण उज्जैनकर (सामाजिक ) मुक्ताई नगर, डॉ.नंदकुमार पालवे (मनोरुग्णसेवा ) बुलढाणा , डॉ.मिलींद दहीवले, ( मानवाधिकार क्षेत्र ) नागपूर, आयुष्मान किरण शिवहर डोंगरदिवे ( समीक्षा क्षेत्र – काव्यप्रदेशातील स्त्री )मेहकर, डी. एन. जाधव ( साहित्य संमेलन क्षेत्र ) औरंगाबाद, विमलताई माळी ( काव्य क्षेत्र ) सोलापूर, संतराज आंबेकर महाराज (बाल अनाथ सेवा ) जाळीचा देव, आनंद महाजन ( आदिवासी क्षेत्र) अमरावती, डॉ. सावली राऊत ( वैद्यकीय क्षेत्र) औरंगाबाद,आयुष्मान संघपाल शिरसाठ ( पत्रकारिता क्षेत्र ) अकोला, प्रा. विमलताई वाणी ( ललीत लेखन ) म्हसावद आणि जळगाव येथील डॉ. राजकुमार कांकरिया ( शैक्षणिक क्षेत्र ) यांना त्यांच्या उपरोक् उल्लेखनीय कार्यासाठी फुले – शाहू – आंबेडकर – राज्यस्तरीय पुरस्कार – २०२१ जाहीर करण्यात आले आहेत. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पहार असे पुरस्कारांचे स्वरूप आहे. ह्या पुरस्कारा़ंचे वितरण २० नोव्हेंबर, २०२२ ला चिखली, जि. बुलढाणा येथील महाराजा अग्रसेन रिसाॅर्ट येथे होणार्या बहुजन साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे संयोजक विधीज्ञ विजयकुमार कस्तुरे यांनी सांगितले.
Users Today : 61