पिंपळखुटा येथे नवरात्र दुर्गादेवी उत्सव शांततेत पार

Khozmaster
2 Min Read

योगेश नागोलकार पातुर चान्नी पोलीसांचा चोख बंदोबस्त विसर्जन सोहळा शांततेत तालुक्यातील पिंपळखुटा येथे मोठ्या उत्साहात नवदुर्गा नवरात्र महोत्सव शांततेत पार पडला.यावेळी मिरवणुकी दरम्यान गावातील सर्व मंडळांनी वेगवेगळे देखाव्यासह व पारंपारिक वाद्य देवीचे आरती,भजन,गरबा, फुगळया या भक्ती मय वातावरणात पार पाडली.ह्या सर्व मिरवणुका चालू झाल्यानंतर महाआरती करिता श्री.भवानी मंदिराच्या प्रांगणात गावातील सर्व देवीचे मंडळे जमा झाले होते व सार्वजनिक महाआरती करण्यात आली.मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळाचे पुजारी श्री भवानी मातेची पूजा करून त्यांच्या हस्ते आरती करण्यात येते व भवानी मंदिराच्या सदस्य कडून मिरवणुकीमधील सहभागी झालेल्या मंडळाच्या देवीची आरती केली जाते..हे शेकडो वर्षाची परंपरा पिंपळखुटा वासीयातर्फे अजूनही जोपासण्यात येत आहे. ही महाआरती मोठ्या थाटात व उत्साहात पार पडते. या महाआरतीची चर्चा पूर्ण पंचक्रोशीत नाव गाजलेली राहते.ही महाआरती झाल्यानंतर सर्व मंडळे मिरवणुकीमध्ये रांगे मध्ये लागून विसर्जन करिता मन व उतावळी नदीमध्ये विसर्जित करतात.ह्या वेळी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले मंडळे 1-श्री नवयुवक दुर्गा मंडळ,2-जागेश्वर दुर्गा मंडळ,3-विजय उत्साही दुर्गा मंडळ,4-बाल गणेश दुर्गा मंडळ,5-शिवभक्त दुर्गा मंडळ,6-गायत्री दुर्गा मंडळ,7-संत तुळसाबाई दुर्गा मंडळ,8-ओम दुर्गा मंडळ ह्या देवी मंडळचा सहभाग होता.यावेळी मिरवणुकीत शांतता समीतीचे सर्व पदाधिकारी पत्रकार,युवक, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आदी मंडळीसह कुठला अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून चांनी पोलीस स्टेशनचा बंदोबस्त ठेवला होता.,ह्या वेळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे उपनिरीक्षक गणेश महाजन उपनिरीक्षक अविनाश मोहिते व संपूर्ण पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्ताला तयनाथ होते. रात्री १० वाजता उतावळी मन नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. व श्री भवानी मंदिराच्या वतीने पोलीस बांधवांचे व पत्रकाराचे पुजाऱ्यांचे गावांतील ग्रामस्थांचे शाल श्रीफळ गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.व कुठला वादीवाद न होता सम्पूर्ण मंडळाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

 

0 9 4 7 5 0
Users Today : 39
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *